Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चुनाळा व टेंबुरवाही येथील आरोग्य उपकेंद्रात कोविड 19 चे लसिकरण सुरु करण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चुनाळा येथे 45 वर्ष वयोगटातील नागरिकांना कोविड 19 चे लसिकरण सु...


अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र चुनाळा येथे 45 वर्ष वयोगटातील नागरिकांना कोविड 19 चे लसिकरण सुरु करण्यात यावे अशी मागणी चुनाळा, बामणवाड़ा येथील नागरिकांनी केली आहे. चुनाळा येथे  45 वर्षा वरील वयोगतातील1062 व बामणवाड़ा येथे 300 असे एकुण 1362 कोविड19 चे लसीकरण घेणारे 45 वर्षावरील वयोगतातील नागरिक असून ते प्राथमिक आरोग्य केंद्र, चिंचोली येथे जाऊ शकत नाही व ग्रामीण रुग्णालय राजुरा येथे मोठी गर्दी असते तर कधी लस उपलब्ध नसल्यामुळे परत यावे लागते. करिता चुनाळा येथील उपकेंद्रा मध्ये चुनाळा व बामणवाडा येथे कोविड19 चे लस उपलब्ध करून लसीकरण केंद्र चालू करावे अशी मागणी बामणवाडा, चुनाळा नागरिकांच्या वतीने बामणवाड़ाचे माजी सरपंच सर्वानंद वाघमारे यांनी आमदार सुभाषभाऊ धोटे, मा. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपुर, मा. तालुका आरोग्य अधिकारी राजुरा यांचेकडे मागणी केली आहे. 

त्याच प्रमाणे टेंबुरवाही येथील उपकेंद्रांला जोडून सिर्सी, बेरडी, भेंडाळा, तुलाना, चिंचबोडी, सोनुर्ली ही गावे लागुन आहे. येथील नागरिकांना लसीकरणाकरिता देवाडा येथे जावे लागत आहे. देवाडा हे अंतर लांब असल्याने व वयोवृद्ध नागरिकांसाठी सोईचे नसल्याने टेंबुरवाही उपकेंद्रांत लसीकरण सुरु करण्याची मागणी आरोग्य विभागाकडे तालुक्यातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रदिप बोबडे यांनी केली आहे. 







Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top