Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गावातील लोकांच्या मदतीकरिता झटत आहे आशाताई, बबनराव व मित्रमंडळी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कोविड रुग्णांच्या मदतीकरिता उरकुडे दाम्पत्य सरसावले कोरोनाच्या या उसळत्या लाटेत गरजूना मिळाला मदतीचा हात ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकार...

  • कोविड रुग्णांच्या मदतीकरिता उरकुडे दाम्पत्य सरसावले
  • कोरोनाच्या या उसळत्या लाटेत गरजूना मिळाला मदतीचा हात
  • ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण ह्या बाळासाहेबांच्या शिकवणीवर चालत आहे सच्चे शिवसैनिक
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण ह्या बाळासाहेबांची शिकवण आचरणात आणायची हीच ती वेळ म्हणत राजुरा तालुक्यातील शेकडो कोविड बाधितांच्या मदतीकरिता सरपंच आशाताई, त्यांचे पती शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख बबन उरकुडे व मित्रमंडळी झटत आहे.
मागील दोन आठवड्यापासून गोवरी गावात तापाची साथ सुरू असल्यामुळे आरोग्य विभागाने सुरू केलेल्या अँटीजन तपासणी शिबिरात तीन दिवसानंतर जवळपास ६६ कोरोना बाधित आढळले. इतक्या संख्येत बाधित आधळल्याने खळबळ उडाली होती. ५९ बाधितांना विसापूर येथील सन्मित्र सैनिकी विद्यालयातील कोविड सेंटर मध्ये उपचारार्थ पाठविण्यात आले होते. अँटीजन तपासणी शिबिरात तीन दिवस राहून गावातील नागरिकांची तपासणी करविण्यासाठी जनजागृती पासून ते कोणतीही गरज पूर्ण करण्याचे कार्य उरकुडे दाम्पत्या कडून करण्यात आले. सन्मित्र सैनिकी विद्यालयातील कोविड सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या बाधितांना खोकल्याच्या त्रास जाणवत असल्याची माहिती मिळताच बबनरावांनी डॉ. दुधेंशी संपर्क साधून Grilinus हि खोकल्याची औषध मिळवून दिली. सोशल डिस्टेंसिंग ठेवत कोविड सेंटर ला भेटी दरम्यान औषधाव्यतिरिक्त सर्वांसाठी जवळपास १०० नारळ पाणी सुद्धा देण्यात आले यावेळी बबन उरकुडे सोबत गोवरी गावच्या सरपंच व त्यांच्या अर्धांगिनी आशा उरकुडे, मित्र मंडळीतील तुफान गिरी, प्रमोद बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते. 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top