- 5 रूग्णांचा मृत्यू ; उपकेंद्रातील 100 हून अधिक बाधित
- उपकेंद्राचे सी.एच.ओ. डेप्युटेशनवर विसापूरला
- पूर्णवेळ सी.एच.ओ आणि लसीकरण केंद्र सुरू करण्याची गावकऱ्यांची मागणी
राजुरा तालुक्यातील चुनाळा येथे आरोग्य विभागाचे वर्धिनी उपकेंद्र आहे. या उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या गावातील लोकसंख्या जवळपास 6000 असून प्राथमिक आरोग्य केंद्र हे 35 किमी अंतरावर चिंचोली (बु) येथे आहे. चुनाळा, बामनवाडा गावात सर्दी, खोकला, ताप या सारख्या आजाराचे मोठ्या प्रमाणात रूग्ण असून कोरानाचा शिरकाव झाला आहे. उपकेंद्राअंतर्गत जवळपास 100 रूग्ण कोरानाबाधित आहेत. त्यापैकी 35 रूग्ण कोविड सेंटरला असून इतर क्वॉरंटाईन आहेत तर 5 रूग्णांचा मृत्यू झालेला असून चुनाळा हे कोरानाचे हॉटस्पॉट ठरत आहे. असे असतांना आरोग्य विभागाने येथे कार्यरत सी..एच.ओ. चे विसापूर येथील कोविड सेंटर ला डेप्युटेशनवर पाठविण्यात आले आहे ही बाब अंत्यत गंभीर असून गावातील नागरीकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. चुनाळा उपकेंद्राअंतर्गत 45 वर्षे वयोगटावरील नागरिकांची लोकसंख्या 1331 असून 1 मे पासून 25 वर्षे वयोगटातील नागरीकांना कोराना लसीकरण करण्यात येणार असतांना सुद्धा या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र 35 किमी अंतरावर असल्यामुळे व राजुरा येथील केंद्रात शहरी भागातील गर्दी असल्यामुळे येथील नागरीकांना लस घेणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे.
गावातील आरोग्य व्यवस्था कोलमडली असतांना सी.एच.ओ. चे डेप्युटेशन हे चुकीचे असून त्यांचे डेप्युटेशन त्वरीत रद्द करूण चुनाळा येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी सरपंच बाळनाथ वडस्कर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.






टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.