- समोसे विक्रेते, भाजी विक्रेते मोडीत आहे नियम
- श्रीकृष्ण टॉकीज, जटपुरा गेट, गंजवार्ड येथील समोसे विक्रेत्यांवर मनपा ची कार्यवाही का नाही?
- न मास्क, न सोशल डिस्टेंसिंग, नियमांचा उडत आहे फज्जा
- बघा गंज वॉर्डातील व्हिडीओ....
कोविड ची साथ आटोक्यात आणण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत १४ एप्रिल पासून कडक निर्बंध लागू केले आहेत. तरी देखील नागरिक कोणत्याही गोष्टींची तमा न बाळगता शासनाकडून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. गंज वॉर्डातील भाजीमंडईत रोज सोशल डिस्टनसिंगचा फज्जा उडत असल्याचं चित्र समोर येत आहे. येथील भाजी विक्रेतेच मास्क घालत नसल्याने रोगराई पसरण्याचा धोका मात्र वाढला आहे. गंज वॉर्डातील भाजी मंडित पहाटेपासूनच सर्व व्यवहार सुरु होत आहे. अगदी सकाळ पासूनच लोक भाजीमंडईमध्ये खरेदीसाठी तोबा गर्दी करत आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना गंज वॉर्डातील मंडित दररोज व्यापारी, आडते तसेच माल घेणारे किरकोळ विक्रेते यांची शेकडोंच्या संख्येने गर्दी उसळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होते. अनेक व्यापारी तसेच ग्राहक तोंडावर मास्क देखील बांधत नाहीत. मालाचा लिलाव करताना व्यापारी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखत नाहीत. सर्वात धोक्याची बाब म्हणजे, याठिकाणी जर कुणी कोरोनाबाधित व्यक्ती असली तर त्यामुळे संसर्ग बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय येथून फळे आणि भाजीपाला घराघरात जातो. अशाने कोरोनाचा फैलाव रोखणे कठीण होऊ शकते
ब्रेक द चेन अंतर्गत टपरी आणि हॉटेल चालकांना अर्ध्या क्षमतेने फक्त पार्सल सेवा या नियमानुसार आस्थापना सुरु करण्याची परवानगी देण्यात आली मात्र श्रीकृष्ण टॉकीज, जटपुरा गेट, गंजवार्ड येथील समोसे विक्रेते नियमांचे उल्लंघन करीत असून सकाळपासूनच सामोसे खाण्याकरिता बेजबाबदार चंद्रपूरकरांची टपरीवर तोबा उसळत आहे. बोटावर मोजण्याइतके ग्राहक पार्सल नेत असून बाकीचे तिथेच समोस्यांच्या आस्वाद घेत आहे. कोरोनाचा पादुर्भाव जेव्हा एकदम कमी होता तेव्हा मनपातील अधिकारी व कर्मचारी दुकानात घुसू घुसू मास्क नाही म्हणत दुकानदारांची हुज्जत घालून दंड वसूल करायचे, आता कोरोनाचा पादुर्भाव वाढला असता हे मनपा चे वसुली अधिकारी या टपरी चालकांवर का कडक कार्यवाही करीत नाही आहे असा प्रश्न शहरातील नागरिकांनी केला आहे.
सदर गंबीर बाब मनपा प्रशासनाच्या निदर्शनाला आणून देखील त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जात आहे. एकंदरीत मनपाने अश्या बेजाबाबदार भाजी विक्रेते, टपरी चालकांवर निर्बंध न आणल्यास व नागरिकांच्या अशा बेजाबाबदार वर्तवणुकीमुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.