Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: तुलाना गावात जिंवत विद्युत तार तुटल्याने आग लागली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तनसचा ढीग व शेतीचे अवजारे जळून खाक विश्वेश्वर मडावी - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - राजुरा तालुक्यातील तुलाना या गावातील मारोती टेकाम यांच्...

  • तनसचा ढीग व शेतीचे अवजारे जळून खाक
विश्वेश्वर मडावी - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील तुलाना या गावातील मारोती टेकाम यांच्या शेतातून गेलेल्या विद्युत खांबाचा जिंवत विद्युत तारा तुटून शेतात असलेल्या तनसीच्या ढिगावर पडल्याने तनिस व शेतीचे अवजारे जळून खाक झाली. 

आधिच शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला गेला असून महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या शेतकर्‍याने वर्षभरासाठी गुंराच्या पोटापाण्यासाठी जमा केलेला चारा जळून खाक झाल्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. तरी तहसीलदार साहेब तसेच महावितरण कंपनीने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळवून देण्याकरिता मदत करावी व दोषी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top