Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते राजुरा तालुक्यात ५० लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते राजुरा  तालुक्यात ५० लाखाच्या विकसकामांचे भुमीपुजन करण्य...

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते राजुरा  तालुक्यात ५० लाखाच्या विकसकामांचे भुमीपुजन करण्यात आले. यात सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. १ चंद्रपूरचा २५१५ ग्रामविकास निधी अंतर्गत मौजा आर्वी येथील अंगणवाडी क्र. १ ते साळवे यांच्या घरापर्यंतचा अंदाजित किंमत १० लक्ष रुपये सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम करणे, मौजा खामोना येथे सामाजिक सभागृह बांधकाम करणे किंमत १०.०० लक्ष, मौजा पांढरपौनी येथे अंतर्गत रस्ता बांधकाम करणे किंमत १५.०० लक्ष, मौजा नाईकनगर  येथील मेनरोड ते नाईक नाईक रस्त्याचे खडकरण व डांबरीकरनाचे बांधकाम करणे. किंमत १५.०० लक्ष रुपये या कामांचा समावेश आहे. 

या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, सभापती मुमताज अब्दुल जावेद, उपसभापती मंगेश गुरणुले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, जिप सदस्य डॉ. नामदेवराव करमनकर, पस सदस्य रामदास पुसाम, आर्वी येथे शालुताई लांडे सरपंच, सुभाष काटवले उपसरपंच, आर्वी येथील ग्राम पंचायत सदस्य उषा उपरे सुरेख रामटेके, सूर्वणा महाकुलकर, वंदना मुसळे, ताने कोहपरे, बंडू आईलवार, मारोती महाकुलकर, भास्कर डोंगे, खामोना येथील हरिदास झाडे सरपंच, कवडू सातपुते माजी सरपंच, लहू चाहरे माजी सरपंच, शारद तलांडे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीबाई लोणारे, अल्का वैद्य, सोनी ठक, मारोती चन्ने, ग्रामसेवक मिलिंद देवगडे, पांढरपौनी येथील आनंदराव लांडे जेष्ठ समजसेवक, बाबुराव लांडे माजी सभापती, महादेव आत्राम सरपंच, सुधीर लांडे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य शंकर घोटेकर, शंकुतला काले, अरुणा उमारे, पर्वता सोयाम, विमल मडावी, लीलाबाई आत्राम, मुर्लीधर आत्राम यासह गावकरी उपस्थित होते. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top