कोरपना -
मागील एक ते दिड महिन्या पासून माणिकगड सिमेंट कंपनीच्या विरोधात साईशांती नगरातील नागरिकांनी धूळ प्रदूषणा बाबत शासन, प्रशासनाला निवेदन दिले. परंतु कंपनी विरोधात कोणत्याही अधिकाऱ्याने चौकशी करण्याची तथा कार्यवाई करण्याचे धाडस दाखविले नाही. उलट कंपनीकडून थट्टा करण्यासारखे धूळ प्रदूषणात लक्षणीय वाढ करीत असल्याचे दिसते.
धूळ प्रदूषणा विरोधात शासन, प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता भाजप नगरसेवक अरविंद डोहे यांच्या नेतृत्वात साईशांती नागरवासियां तर्फे कंपनी विरोधात तसेच स्थानिक प्रदूषणा विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. गडचांदूर येथील राजीव गांधी चौकातुन काढण्यात आलेल्या मोर्च्यात शेकडो महिला, पुरुषांनी काळे कपडे परिधान करून सहभाग घेतला. यावेळी घरावर काळे झेंडे व दारावर कंपनी विरोधात निषेध बॅनर लावण्यात आले होते.
भाजपाचे शहर अध्यक्ष सतीश उपलेंचिवार, शिवसेना नगरसेवक सागर ठाकुरवार यांनी सुद्धा आम्ही साईशांती नगरवासी सोबत आहो आम्हच्या पक्ष्याचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे जाहीर केले. यावेळी नगरसेवक अरविंद डोहे, निलेश ताजने, न्यूतेश डाखरे, रवींद्र चौथाले, महेंद्र ताकसांडे, माजी नगराध्यक्ष सौ. डोहे, सौ माधुरी ठावरी, स्मिता पिदूरकर उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.