Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपना येथील स्व. संगीता चटप कनिष्ठ महाविद्यालयात "स्वच्छ गाव - हरित गाव" कार्यक्रम संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी कोरपना - नेहरू युवा केंद्र चंद्रपूर द्वारा स्व. संगीता चटप कनिष्ठ महाविद्यालय कोरपना येथे ...

शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना -
नेहरू युवा केंद्र चंद्रपूर द्वारा स्व. संगीता चटप कनिष्ठ महाविद्यालय कोरपना येथे "स्वच्छ गाव - हरित गाव" कर्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला स्व. संगीता चटप कनिष्ठ महाविद्यालय कोरपना चे प्राचार्य जुनघरी सर, प्राध्यापक गेडाम सर, उपलेंचीवार सर, जाधव सर व अंबुजा सिमेंट फाउंडेशन चे क्षेत्र अधिकारी प्रदीप कुडमेथे तसेच महाविद्यालयातील सर्व कर्मचारी व शेकडो युवक व युवती उपस्थित होते. 

प्राचार्य जुनघरी सर यांनी स्वच्छ गांव व हरित गांव यावर मार्गदर्शन केले. मार्गदर्शन करतांना आपण स्वच्छ असलो तर आपला परिसर व आपला गाव कसा स्वच्छ ठेवता येईल यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित युवा व युवतींना नेहरू युवा केंद्र चंद्रपूर तर्फे पेन, रजिस्टर, फोल्डर, मास्क, सॅनिटाईजरचे वाटप करण्यात आले. संचालन उपलेंचीवार सर, आभार जाधव सर यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन नेहरू युवा केंद्र चंद्रपूर, राष्ट्रीय युवा स्वयंसेवक कोरपना तालुका प्रतिनिधी सचिन मधुकर कुडमेथे यांनी केले होते. 


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top