- पोलिसांनी कडक कारवाई करावी; कुटुंबीयांची मागणी
सदर घटनेनंतर ग्रामीण रुग्णालय गडचांदुर येथे उपचार केल्यानंतर नामवाड कुटुंबीय चंद्रपूर येथील शासकिय रुग्णालयात आले आहे. आई व वडिल दोघांना अधिक मार लागलेला असून याबाबत जिवती पोलीस स्टेशनला मी तक्रार दिली असून माझ्या आईला मारहाण होऊन देखील तिचे बयाण पोलिसांनी घेतले नाही असे हिमांशु नामवाड म्हणाले. पुढे ते म्हणाले की, भारतीय दंड विधान संहितेतील कलम ३२३, १४३,१४७,१४९ नुसार गोतावळे व त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हा नोंदविणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अद्याप भर चौकात मारहाण करून देखील कोणालाही पोलिसांनी अटक केली नाही. तसेच वैद्यकीय तपासणीत जबर मारहाण समोर येत असताना त्याबाबतची कायदेशीर कारवाई झाली नसल्याने हिमांशु नामवाड यांनी आज पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांची भेट घेत अंकुश गोतावळे व त्यांच्या सहकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी लेखी निवेदनातून केली आहे. एका शुल्लक कारणातून संपूर्ण कुटुंबिययांना झालेल्या मारहाणीत पूर्वीचे वैमस्य किंवा आकस आहे का याबाबत सखोल चौकशीची गरज आहे त्यासाठी आरोपींची पोलीस कोठडीत कठोर चौकशी झाली पाहिजे अशी मागणी नामवाड कुटुंबीय करत आहे. जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारीच्या पार्श्वभूमी पोलीस प्रशासनाचा धाक गुंड प्रवृत्तीच्या लोकांत राहावा आणि कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून पोलीस प्रशासन काय कारवाई करते याकडे आता लक्ष लागले आहे.




टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.