Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: स्पर्धेच्या जगात पुढे जायचे असेल तर इंग्रजी येणे जरुरी - एड. वामनराव चटप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूलचे थाटात उदघाटन अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - सध्या विद्यार्थ्यांंना जागतिक स्तरावर स्पर्...

  • ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूलचे थाटात उदघाटन

अनिल गंपावार - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -
सध्या विद्यार्थ्यांंना जागतिक स्तरावर स्पर्धेला सामोरे जावे लागते. यासाठी पूर्व प्राथमिक शिक्षणा पासून विद्यार्थ्यांचा पाया मजबूत असावा लागतो. कृतिशील, आनंददायी शिक्षण देतानाच विद्यार्थ्यांत चरित्र, आत्मविश्वास व प्रामाणिक पणाचे धडे दिले तर ही संस्कारशील मुले उद्याचा संपन्न व जागरूक नागरिक बनू शकेल. विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या जगात पुढे जायचे असेल तर इंग्रजी येणे जरुरी आहे असे प्रतिपादन माजी आमदार एड. वामनराव चटप यांनी केले ते ब्लॅक डायमंड इंग्लिश स्कूलच्या उदघाटनात बोलत होते. 

स्थानिक रामनगर कॉलनी येथे विधाता फाऊंडेशन द्वारे ब्लॅक डायमंड इंटरनॅशनल स्कूलच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार एड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, नगराध्यक्ष अरुण धोटे, शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सुधाकर अडबाले, वणी पंचायत समितीचे सभापती संजय पिंपळशेंडे, व्यापारी असो. चे अध्यक्ष व नप शिक्षण सभापती राधेश्यामजी अडानिया, माजी नगराध्यक्ष रमेश नळे, माजी जिप सदस्य अविनाश जाधव, एड. अरुण धोटे, नगरसेवक दिलीप डेरकर, विशाल खंडाळकर इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना एड. मनोज काकडे यांनी ही शाळा सिंगापूर पॅटर्नच्या अभ्यासक्रमा नुसार शिक्षण देणार असून यानिमित्ताने हसत खेळत आनंददायी प्री-प्रायमरी शिक्षण देणारी अद्ययावत शाळा असणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन जयश्री मालेकर तर आभार शुभांगी धोटे यांनी केले. यावेळी चित्रकला स्पर्धेत पुरस्कार प्राप्त आराध्या पांडे, नरेंद्र ढवस, मनस्वी बोबडे, मुग्धा मोरे यांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. उदघाटन कार्यक्रमाला मोहन धोटे, संदीप मालेकर, शशांक धोटे, केशव ठाकरे, शेख आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top