Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चिमूर येथील तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर केला अत्याचार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दुसरीसोबत साक्षगंध पीडित तरुणीने नागपुरातील नवीन कामठी पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल आयशा - आमचा विदर्भ कार्यालय प्रतिनिधी नागपूर - लग्नाचे...

  • दुसरीसोबत साक्षगंध
  • पीडित तरुणीने नागपुरातील नवीन कामठी पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखल

आयशा - आमचा विदर्भ कार्यालय प्रतिनिधी
नागपूर -
लग्नाचे आमिष दाखवून युवकाने तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या तरुणीशी साक्षगंध केले. यामुळे पीडित तरुणीने नवीन कामठी पोलिस स्टेशन गाठून युवकाविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून युवकाचा शोध सुरू केला आहे. धर्मदास उत्तमराव गेडाम (रा. चिमूर, जि. चंद्रपूर), असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे.

पीडित तरुणी कामठी येथे राहाते. ती उच्चशिक्षण घेत आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये धर्मदास हा विद्यापीठात एमए करीत होता. यादरम्यान विद्यापीठ ग्रंथालयात त्याची पीडित तरुणीसोबत ओळख झाली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर शेगावसह विविध ठिकाणी अत्याचार केला.

दरम्यान, धर्मदास याने अन्य तरुणीसोबत साक्षगंध केले. याबाबत पीडित तरुणीने त्याला जाब विचारला असता धर्मदास याने लग्नास नकार देत, तरुणीला ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडित तरुणीने नवीन कामठी पोलिसांत तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक आर.एस. नरोटे यांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून धर्मदास याचा शोध सुरू केला आहे. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top