Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विदर्भ महाविद्यालय जिवती ला २६ मार्च रोजी पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी कोरपना - श्री व्यकंटेश बहुउद्देशीय शिक्षण संस्था गडचांदूर द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ, गड...

शैलेश कोरांगे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
कोरपना -
श्री व्यकंटेश बहुउद्देशीय शिक्षण संस्था गडचांदूर द्वारा संचालित गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली संलग्नित अतिदुर्गम क्षेत्र जिवतीतील विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स एन्ड सायन्स येथे दि. २६ मार्च २०२१ ला सकाळी ११ वाजता पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ आयोजित केला आहे.

या कार्यक्रमात कार्यक्रमाचे उद्घाटक संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, तर अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव शेख रऊफ शेख चमन तसेच प्रमुख पाहुणे  अंजनाताई पवार सभापती पंचायत समिती जिवती व संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून सर्व विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.शाक्य यांनी केले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top