Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महावितरणच्या अधिकाऱ्यांना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली वीज ग्राहकांना वीज देयके भरण्यासाठी सवलत देण्याच्या सूचना
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या शिष्ट मंडळाने घेतली महावितरण अधिकाऱ्यांनची भेट शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - भारतीय जन...

  • भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या शिष्ट मंडळाने घेतली महावितरण अधिकाऱ्यांनची भेट
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या शिष्टमंडळाने आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सुचने नुसार भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात बाबूपेठ येथील महावितरणच्या कार्यालयातील मुख्य अभियंता देशपांडे यांची भेट घेतली. यावेळी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भ्रमणध्वनीवर मुख्य अभियंता देशपांडे यांना विज ग्राहकांना वीज देयके भरण्यासाठी 12 टप्प्याची सवलत उपलब्ध करून देऊन या योजनेच्या प्रसिद्धी साठी महावितरण विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात यावे अशी दिली. यावेळी मुख्य अभियंता देशपांडे यांनी या योजनेची माहिती व प्रसिद्धी नागरिकांन पर्यंत पोहचविण्यासाठी महावितरण विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या शिष्टमंडळात मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, नगरसेवक प्रदीप किरमे, भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर महानगर महामंत्री प्रज्वलंत कडू, भाजपा सचिव चांदभाई पाशा, अमोल नगराळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top