Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नागपूर शहर आणि जिल्ह्यात करोनाचा स्फोट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
४ हजारांवर रुग्णसंख्येसह गाठला नवा उच्चांक गेल्या २४ तासांत ४ हजार ९५ नवीन रुग्णांची भर करोनाची साथ आल्यापासूनची उच्चांकी रुग्णवाढ नागपूर शह...

  • ४ हजारांवर रुग्णसंख्येसह गाठला नवा उच्चांक
  • गेल्या २४ तासांत ४ हजार ९५ नवीन रुग्णांची भर
  • करोनाची साथ आल्यापासूनची उच्चांकी रुग्णवाढ
  • नागपूर शहरातील स्थिती होत आहे अधिकच गंभीर

आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नागपूर -
शहरात लॉकडाऊन लावण्यात आले असले तरी रुग्णसंख्या कमी झालेली नाही. गेल्या २४ तासांत नागपूर शहर आणि जिल्ह्यात आजवरच्या सर्वोच्च रुग्णसंख्येची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनही हादरलं आहे.

नागपुरात करोना साथीने शिरकाव केल्यानंतर आजवरचा उच्चांक आज नोंदवला गेला आहे. जिल्ह्यात आज एका दिवसात तब्बल ४ हजार ९५ नवीन करोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्याचवेळी आज १ हजार ९४३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत तर ३५ रुग्ण करोनाने दगावले आहेत. नागपूर शहरातील स्थिती अधिक गंभीर आहे. नागपूर शहरातही दैनंदिन रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला गेला असून आज २ हजार ९६६ नवीन रुग्णांची भर पडली आहे. शहरात १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नागपूर शहरात करोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले टाकत लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. नागपूर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. त्याअनुषंगाने अनेक निर्बंध आणण्यात आले आहेत. त्याचवेळी आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन झटून काम करत आहे. गेल्या काही दिवसांत करोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. लसीकरण मोहिमेलाही वेग देण्यात आला आहे. असे असताना करोनाचे आकडे कमी होण्याऐवजी वाढतच चालल्याने भीती वाढू लागली आहे.

दरम्यान, करोनाचा वेगाने फैलाव होत असल्याने नागपुरात होळी, धूलिवंदन आणि शब-ए-बारात हे सण-उत्सव खासगी वा सार्वजनिक स्वरूपात एकत्र येऊन साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. शहरात मिरवणूक काढण्यासही मनाई राहणार आहे. २९ मार्च रोजी (धूलिवंदन) बाजारपेठ, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स पूर्णपणे बंद राहतील तसेच भाजीपाला, मटण, चिकन शॉपसाठी दुपारी १ वाजेपर्यंतच परवानगी असेल, असे पालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top