- १५ ते २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाउन
- अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
- पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली लॉकडाउनची घोषणा
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीनंतर राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन लॉकडाउनची घोषणा केली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते. ११ मार्चला नागपुरात पहिला रुग्ण आढळला. नोव्हेंबरपासून रुग्णसंख्या कमी झाल्याने सुरळीत सुरू होते, मात्र पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याने लॉकडाउन करण्यात येत आहे. लॉकडाउनला नागरिकांनी गांभीर्याने घ्यावे, असे आवाहन राऊत यांनी केले. गृहविलगीकरणात फिरणारे बाहेर फिरताना आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांची रवानगी क्वारंटाइन केंद्रात करण्यात येणार आहे. करोनाशी लढण्यासाठी आरोग्य व्यवस्था सक्षम असून खाटांची व्यवस्था, व्हॅंटीलेटर, डॉक्टर्स पुरेशा प्रमाणात असल्याचे राऊत म्हणाले.
हे सुरू राहणार
- बँक, पोस्ट, भाजीपाला, अंडे, मास, मच्छी, चष्म्याची दुकाने
- उद्योग
- शासकीय कार्यालये २५ टक्के उपस्थितीत सुरू
- मार्च एंडिंगची सर्व कामे पूर्ण क्षमतेने सुरू राहणार
- माध्यम प्रतिनिधींचा ओळखपत्र दाखवूनच संचार
- लसीकरण सुरू राहणार
- वैद्यकीय, पॅरामेडिकल व अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
- खाद्यपदार्थांची घरपोच सेवा सुरू राहणार, ओळखपत्र बाळगणे गरजेचे
हे बंद राहणार
- खासगी कार्यालये बंद
- मद्यविक्री दुकाने बंद राहणार, केवळ ऑनलाइन विक्री सुरू राहणार
- अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व व्यवहार बंद राहतील
२ लाख लसीकरणाचे उद्दिष्ट
१३१ लसीकरण केंद्रांवर २ लाख लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. लसीकरण करण्यासाठी नागरिकांसाठी लोकप्रतिनिधींनी वाहनांची सुविधा करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आमदार निवासात विलगीकरण
गृह विलगीकरणात ठेऊनही अनेक जण बाहेर फिरताना दिसत आहेत, अशांना आणि ज्यांच्याकडे गृहविलगीकरणाची सुविधा नाही, अशांना आमदार निवासात ठेवण्यात येणार आहे. डॉक्टरांसाठी वनामती येथे विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे राऊत यांनी सांगितले. गृहविलगीकरणात असणारे घरातच आहे की नाही यासाठी प्रशासनाची चमू आकस्मिक भेट देणार.
हे हॉटस्पॉट
मंगळवारी, हनुमाननगर, लक्ष्मीनगर, धरमपेठ हा परिसर हॉटस्पॉट असून येथे चोख बंदोबस्त राहणार आहे. या भागात चोख बंदोबस्त असेल. करोनाचे रुग्ण वाढू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येणार असल्याचे राऊत म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.