- भाजपाने साजरा केला जन औषधी दिवस
चंद्रपूर -
दिवसागणिक आज रुग्ण संख्येत वाढ होत आहे. औषधीचा खर्च सर्वसामान्यांना परवडण्यासारखा राहिला नाही, म्हणून मोदी सरकारने जन औषधी उपक्रम सुरू केला. पर्याय म्हणून जेनेरिक औषधी उपलब्ध करून दिली. या औषधी डॉक्टरांनी लिहून दिल्या तर, सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. जेनेरिक औषधी रुग्णांसाठी वरदान आहेत, असे प्रतिपादन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले. ते भारतीय जनता पार्टी वैद्यकीय मोर्चा तर्फे जन मेडिकल स्टोर येथे रविवार (७ मार्च) ला आयोजित जन औषधी दिवस कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून डॉ गुलवाडे बोलत होते.
यावेळी भाजपा वैद्यकीय मोर्चा जिल्हाध्यक्ष डॉ. किरण देशपांडे, भाजपा नेते नरेंद्र तिखे, धनराज कोवे, रामकुमार आक्कपेल्लीवार, विकास गेडाम, किशोर आत्राम, प्रवीण उरकुडे, अनिता शील, सुजाना शील, रिंकू मंडल आदींची उपस्थिती होती.
डॉ गुलवाडे म्हणाले, इंडियन रेडक्रॉस सोसायटी व भारत सरकारचा हा संयुक्त उपक्रम आहे. गोरगरीब जनते पर्यंत याची माहिती पोहचविण्याचे कार्य, भाजपा वैद्यकीय आघाडीने करावे. शहरातील अधिकाधिक डॉक्टर्स यात सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. देशपांडे यांनी केले. संचालन रामकुमार अकापेलिवार यांनी केले. कोवे यांनी आभार मानले.






टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.