- राजुरा येथे संवाद व बैठक कार्यशाळा संपन्न
स्थानिक पंस सभागृहात संपन्न झालेल्या बैठकीत उपस्थित मान्यवरांचे ग्रामगीता भेट देवून स्वागत करण्यात आले. या कार्यशाळेला तहसिलदार हरिष गाडे, गटविकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, पोलीस निरिक्षक चंद्रशेखर बहादुरे, बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली सटाले, पंस सदस्य कुंदाताई जेनेकर, रामदास पुसाम, नगर परिषद क्षेत्रातील नगरसेवक, तालुक्यातील सर्व सरपंच व उपसरपंच यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी मास्कचा वापर व शारीरिक अंतर याबाबत कोणीही निष्काळजीपणा करु नये तसेच शासन निर्देशाचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करण्यासाठी काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे संचालन मुख्याध्यपक रत्नाकर भेंडे सर यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी (कृषी) नरेंद्र पेटकर यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेकरिता विस्तार अधिकारी (आरोग्य) साहेबराव पवार, विस्तार अधिकारी (पंचायत) अमित महाजनवार, विस्तार अधिकारी (कृषी) रमेश चुन्ने, विस्तार अधिकारी (शिक्षण) संजय हेडाऊ, विस्तार अधिकारी (शिक्षण) श्रीराम मेश्राम, मुसा शेख, रिता देरकर, ज्योती गुरनुले, राकेश रामटेके, राहुल वंजारी गट साधन केंद्र यांनी परिश्रम घेतले.






टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.