Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शेतकरी आत्महत्येची 15 प्रकरणे मदतीसाठी पात्र
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी घेतला आढावा मनोज सोगलकर - आमचा विदर्भ विशेष प्रतिनिधी चंद्रपूर - नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीच...

  • अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी घेतला आढावा

मनोज सोगलकर - आमचा विदर्भ विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -
नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्जपरतफेडीचा तगादा या कारणास्तव आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासकीय मदत देण्यासाठी जिल्ह्यातील एकूण 15 प्रकरणे पात्र ठरविण्यात आली असून त्यांचे कुटूंबाला प्रत्येक प्रकरणी एक लक्ष रुपये सानुग्रह मदत त्वरीत देण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज दिले आहेत.

जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या प्रकरणे तपासणी समितीची बैठक अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. याअंतर्गत एकूण 23 प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. यापैकी 15 प्रकरणे पात्र, 5अपात्र तर 2 प्रकरणांची फेरतपासणी करण्यात येणार आहे.

पात्र प्रकरणात कोरपना तालुक्यातील निमणी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी मंगेश तिखट, कोठोडा बु. येथील मोतीराम तोडासे, राजुरा तालुक्यातील पांढरपौनी येथील प्रभाकर वैद्य, विरूर स्टे. येथील गुलाब गोहणे व सुरेश दोरखंडे, पाचगाव येथील शंकर बोरकुटे, टेकामांडवा येथील विक्रम सोडनर, नागभिड तालुक्यातील मोहाडी येथील बळीराम शेंडे, चंद्रपूर तालुक्यातील दाताळा येथील महादेव येलमुले, ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथील जिवन उंदीरवाडे व जगन्नाथ राऊत, गणेशपूर येथील अनिल गुरनुले, सौन्द्री येथील नंदकिशोर राऊत, चिंचोली बुज. येथील नामदेव ढोरे, वरोरा तालुक्यातील राजू जेवुरकर यांच्या प्रकरणांचा समावेश आहे.

बैठकीला पोलीस विभाग, आरोग्य व कृषी  विभागाचे तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा अग्रणी बँक व कृषी विकास अधिकारी कार्यालयाचे संबंधीत अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top