Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पिपर्डा रस्त्याचे काम रखडले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
त्वरीत काम सुरु करण्याची मागणी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स कोरपना - कोरपना व जिवती तालुक्याला जोडणारा वनसडी-पिपर्डा-पकड्डीगडम मार्ग मुख्य...

  • त्वरीत काम सुरु करण्याची मागणी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
कोरपना -
कोरपना व जिवती तालुक्याला जोडणारा वनसडी-पिपर्डा-पकड्डीगडम मार्ग मुख्यमंत्री सडक योजनेत खोजनेत सन २०१८-१९ वित्तिय वर्षा पासुन प्रस्तावित आहे. पिपर्डा पोच रस्ता कामाचे निविदा होऊनसुद्धा कंत्राटदार कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी लावला आहे. 

सदर कामाला गत वर्षी सुरूवात करण्यात अली होती. रस्त्यावर मुरूम, गिट्टी, बोल्डर साठविले. धातुर-मातुर रस्ता सफाई करण्यात आले मात्र दोन वर्षे लोटूनही काम पुर्ण होण्या ऐवजी साठविलेले साहित्य उचलुन नेत दुसऱ्या ठिकाणी त्यासाहित्याच्या वापर करण्यात आला. रास्ता मात्र नादुरुस्त राहिल्याने नागरिकांना वाहन जाणे-येणे करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने तालुक्यातील वनसडी, पिपर्डा, पकड्डीगडम रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांनी सांगितले कि, गत १० वर्षात जिप बांधकाम विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने साधे खड्डे बुजविण्याचे सुद्धा प्रयत्न केले नाही. या रस्त्याची ऐशीतैशी झाली असतांना मजुर व निधि उपलब्ध असतांना काम न करणाऱ्या ठेकेदारावर कार्यवाही का केल्या जात नाही आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. 

कामे रखडल्याने परीसरातील विकासावर परिणाम होत असुन रस्त्या अभावी बससेवा बंद पडली आहे. मंज़ुर व कार्यआरंभ आदेश दिलेल्या कामे ठराविक वेळेत पुर्ण करून घेण्याची जवाबदारी संबंधित विभागाची असते ठेकेदारावर कार्यवाही सोबतच कामात कुसूर केल्याचा ठपका ठेवत दोषी अधिकाऱ्यांवर सुद्धा कार्यवाही करण्याची मागणी नागरिक करीत आहे. रास्ता त्वरित दुरुस्त करून दोषींवर कार्यवाही करावी, योग्य कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे स आबीद अली यांनी दिला आहे.  




Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top