Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विद्यार्थ्यांनी घेतला मराठी भाषा गौरव दिना निमित्य शब्दसंग्रहात भाग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तिरुपती नल्लाला - आमचा विदर्भ प्रतिनिधी विरूर स्टेशन (राजुरा) - जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनुर्ली येथे २० फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्र...

तिरुपती नल्लाला - आमचा विदर्भ प्रतिनिधी
विरूर स्टेशन (राजुरा) -
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सोनुर्ली येथे २० फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त "माझा मराठी बोलीभाषेचा शब्दकोश " या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सर्वाधिक शब्दांचा संग्रह करणाऱ्या तीन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. यात आकाश मारोती ढोले इयत्ता ६ वी प्रथम क्रमांक, सुमीत दशरथ पेटकर इयत्ता ७ वी द्वितीय क्रमांक व अंतरीष बापुराव आदे इयत्ता ७ वी याने तृतीय क्रमाक पटकावला. 

कार्यक्रमाचे नियोजन भाषा शिक्षक दिलीप पाटील यांनी केले. परिक्षणाची जबाबदारी जेष्ठ सहशिक्षक सुरेश भगत सरांनी सांभाळली. सुनोजी किनगे सर व निलेश कुळमेथे सरांनी सहकार्य केले. मुख्याध्यापक किरण सोयाम यांनी उपक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top