Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शिवजयंती निमित्ताने राष्ट्रीय सेवा योजना व युवा गृप वरूर रोड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तिरुपती नल्लाला - आमचा विदर्भ प्रतिनिधी वरूर रोड (राजुरा) - शिवजयंती चे औचित्य साधून वरूर रोड येथील युवकांनी एकत्र येऊन युवा गृप व राष्ट्रीय...

तिरुपती नल्लाला - आमचा विदर्भ प्रतिनिधी
वरूर रोड (राजुरा) -
शिवजयंती चे औचित्य साधून वरूर रोड येथील युवकांनी एकत्र येऊन युवा गृप व राष्ट्रीय सेवा योजना पथक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने वरूर रोड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, सत्र 2019-20  या वर्षीचा महाराष्ट्र राज्य स्तरीय राष्ट्रीय सेवा योजना सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार प्राप्त विशाल मनोहर शेंडे यांनी पुढाकार घेऊन त्याच्या सहकारी मित्रांच्या सहकार्याने वरूर रोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले त्यामध्ये 26 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 

यावेळी गावातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या मध्ये भाग घेतला, सकाळी रक्तदान शिबिर आणि सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवन चरित्रावर व्याख्यान असे विविधांगी कार्यक्रम घेऊन शिवाजी जयंती साजरी करण्यात आली, यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बलकी, डॉ. मुद्दमवार, प्रा. मनुरे उपस्थित होते. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top