- लोकनेते आबिद अली यांनी दिली होती सार्वजनिक बांधकाम विभागाला तंबी
कोरपना -
कोरपना तालुक्यातील मुख्यमंत्री सडक योजना व आदिवासी उपयोजनेअंतर्गत पिपर्डा, वनसडी, कारगाव रस्ता मागील दोन वर्षांपूर्वी मंजूर असताना देखील ठेकेदारा मार्फत काम करण्यात दिरंगाई करण्यात येत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे व सर्वसामान्यांच्या प्रश्नाला धावून जाणारे लोकनेते आबिद अली यांनी ही बाब संबंधित विभागाचा निदर्शनास आणून दिली होती. तातडीने रस्त्याचे काम सुरू करा अशी मागणी करून आंदोलनाचा इशारा सुद्धा आबिद अली यांनी दिला होता. आबिद अली यांच्या तंबीची वेळीच दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी कंत्राटदाराला तातडीने काम सुरू करा अन्यथा कारवाई करू असे निर्देश देताच संबंधित कंत्राटदाराने दोन दिवसात संपूर्ण साहित्याची जुळवाजुळव करून स्त्याच्या कामाला वेगाने सुरुवात केली आहे. पंधरा दिवसात हे काम पूर्ण करू असे म्हणत त्यांनी जलद गतीने रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. रस्त्याचे काम सुरु झाल्या मुळे गावकरी दोन वर्षापासून रेंगाळलेला प्रश्न मार्गी लागल्याबद्दल उत्साहित दिसून येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.