- ग्रापं निवडणुकीत राजुरा तालुक्यात भारतीय जनता पक्षाला जोरदार यश
तिरुपती नल्लाला - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा / विरूर स्टे. -
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपने जागा जिंकल्या असून तालुक्यातील १० ग्राम पंचायतीत सरपंच तर काही ग्रामपंचायतीत अन्य पॅनेलच्या समर्थनाने उपसरपंचपद मिळविले आहे. कोल बेल्ट मधील सुब्बई जवळील चिंचोली (बूज.) ग्रामपंचायतीत सरपंच पिलाजी पा. भोंगळे हे सरपंच तर पुष्पांजली शंकर धनवलकर उपसरपंच बनले आहे. धोपटाला कोल बेल्ट मध्ये येणाऱ्या कोलगाव, वरोडा, पोवनी, चिंचोली (खु.), कढोली येथे भाजप ने सरपंच, उपसरपंच पद मिळविले. त्याच प्रमाणे चुनाळा येथे सुद्धा भाजप ने विजयी मिळवला आहे. धिडशी, खामोना-माथरा गट ग्राम पंचायत, सुमठाना-बोडखा गट ग्राम पंचायत येथे सुद्धा भाजप ने विजयी मिळविला. कोहपरा मध्ये सरपंच पद भाजपला मिळाले असून सातरी ग्राम पंचायतीत भाजप-मित्रपक्षाचे सरपंच उपसरपंच बनले असून पेल्लोरा ग्राम पंचायतीत भाजप चा उपसरपंच बनला आहे.
विजयी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व ग्राम पंचायत सदस्यांचे माजी आमदार एड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, भाजप नेते सतीश धोटे, जिप सभापती सुनील उरकुडे, भाजपा तालुका महामंत्री एड.इंजि. प्रशांत घरोटे, नप सभापती तथा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्यामजी अडानिया, दिलीप वांढरे यांनी अभिनंदन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.