- किसान जिनिंग व गणेश कोटेक्स येथे सीसीआय खरेदी सुरू
- सीसीआय सेंटरला पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली भेट
राजुरा -
संकटात असलेल्या शेतकर्यांच्या कापसाची बेभाव खरेदी होत असताना शासकीय कापूस खरेदी सुरू झाल्यामुळे शेतकरी बंधवाना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव देणारी राजुरा तालुक्यातील सुप्रसिद्ध किसान जिनिंग एन्ड प्रेसिंग आसिफाबाद रोड तुलाना येथे सकाळी १०.३० वाजता तर खामोना येथील गणेश कोटेक्स येथे सकाळी ११०.३० वाजता सीसीआय द्वारे कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.
किसान जिनिंग एन्ड प्रेसिंग तुलाना येथे पहिल्याच दिवशी ४० शेतकऱ्यांनी तर गणेश कोटेक्स येथे २० शेतकऱ्यांनी आपला कापूस विक्रीकरिता आणला. यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती कवडू पोटे, सचिव एम.जे. मेश्राम, सेंट्रल इंचार्ज दिलीप कांबळे, व्यापारी एसोसिएशन चे अध्यक्ष, नगरसेवक तसेच किसान जिनिंग चे संचालक राधेश्यामजी अडानिया, प्रतिष्ठित व्यावसायिक व गणेश कोटेक्स चे संचालक मनमोहन सारडा, हंसानी आदी उपस्थित होते. शेतकरी बंधूंच्या कापसाला सरकारने घोषित केल्याप्रमाणे हमीभाव देऊन कापूस खरेदी प्रारंभ करण्यात आला.सीसीआय सेंटरला पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली भेट
जिल्ह्यात सर्वत्र सीसीआय द्वारे कापूस खरेदी सुरु झाली आहे. राजुरा तालुक्यातील तुलाना येथील किसान जिनिंग येथील सीसीआय सेंटरला पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भेट दिली. यावर्षी कापसावर आलेल्या रोगामुळे काही प्रमाणात अपरीपक्व (कवडी) कापूस शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणावा लागत आहे. या कापसाच्या खरेदीसाठी सीसीआय ला संमती प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना संबंधित ग्रेडर व अधिकाऱ्यांना ला यावेळी केली व या परवानगी साठी केंद्र सरकारला विनंती करणार असे आश्वासन दिले. कापसाची हमीभावाने खरेदी झाली पाहिजे अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्ह्यात कापसाची खरेदी सुरु झाली असल्याने हमीभावाने कापूस विकल्या जाणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसून येत आहे. यावेळी अहिर सोबत जेष्ठ नेते खुशाल बोन्डे, राधेश्यामजी अडानिया, माजी आमदार निमकर, बाजार समिती सभापती कवडू पा. पोटे, बाजार समिती सचिव एम.जे. मेश्राम, राजू घरोटे, मधुकर नरड, एड.इंजि. प्रशांत घरोटे, सचिन डोहे, प्रशांत गुंडावार, हरिदास झाडे उपस्थित होते.






टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.