Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अवैध रेती वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक राजुरा येथील व्यापाऱ्याचा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रेती तस्करीचे मुख्य ठिकाण बनत आहे राजुरा ? जिल्ह्यात चार ठिकाणी अवैध रेती तस्करीवर छापा खनिज विभागाच्या भरारी पथकाची कारवाई आमचा विदर्भ - ब्...
  • रेती तस्करीचे मुख्य ठिकाण बनत आहे राजुरा ?
  • जिल्ह्यात चार ठिकाणी अवैध रेती तस्करीवर छापा
  • खनिज विभागाच्या भरारी पथकाची कारवाई
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -

जिल्ह्यात 20 नोव्हेंबर 2020 रोजी चार ठिकाणी जिल्हा खनिकर्म कार्यालयाच्या भरारी पथकाने छापा टाकून अवैध रेती वाहतुकीतील ट्रक व रेतीसाठा जप्त केला आहे.
जिल्हा खनिकर्म कार्यालयाच्या भरारी पथकाने दुपारी 1 वाजता मौजा कोठारी ता. बल्लारपुर येथे में. सुयोग ट्रान्सपोर्ट, राजुरा, यांच्या ट्रकवर छापा मारून अवैध रेती वाहतूक पकडली. सदर वाहानावरील वाहतूक पासेसची तपासणी करण्यात आली असता छत्तीसगड राज्य येथील बनावट वाहतूक पासद्वारे अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनात आले. अवैध रेती वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रक में. सुयोग ट्रान्सपोर्ट, राजुरा येथील राजू धोटे यांच्या मालकीचा असल्याची माहिती वाहानचालकाने दिली आहे. सदर फूल बॉडी ट्रक क्र. एम.एच -34 अेबी 6363 जप्त करण्यात आला आहे.
तसेच गोंडपिपरी तालुक्यातील मौजा विठ्ठलवाडा येथील शरद गायकवाड यांचे शेतात अंदाजे 100 ब्रास अवैध साठवणूक केलेली रेती, येनबोथला येथील सरकारी जागेवरील 500 ब्रास रेती, तारसा येथील स्मशान भूमिवरील अंदाजे 150 ब्रास अवैध सावठवणूक केलेली रेती जप्त करण्यात आली आहे.
अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता जिल्ह्यात सभाव्य गौण खनिज चोरी होणार्‍या ठिकाणी आकस्मित धाडी टाकून अवैध खनिज उत्खनन व वाहतूक करणार्‍या व्याक्तीवर व वाहानावर  महाराष्ट्र जमीन महसूल संहिता-1966 च्या कलम 48 च्या तरतुदीअन्वये कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिली आहे. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top