Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपुरात प्रेमसंबंधातून ४५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह हिंगण्यात पुरला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वादातून गळा दाबून हत्या केल्याचा आरोप; आरोपी अटकेत, पोलिसांकडून तपास सुरू आमचा विदर्भ - वृत्तसेवा  चंद्रपूर (दि. १८ ऑक्टोबर २०२६) -         ...
वादातून गळा दाबून हत्या केल्याचा आरोप; आरोपी अटकेत, पोलिसांकडून तपास सुरू
आमचा विदर्भ - वृत्तसेवा 
चंद्रपूर (दि. १८ ऑक्टोबर २०२६) -
        प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान ४५ वर्षीय महिलेच्या हत्येत झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. महिलेची गळा दाबून हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे नेऊन पुरल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी चंद्रपूर पोलिसांनी संतोष साखरकर (वय ४९, रा. तुकूम, चंद्रपूर) याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

        संबंधित महिला आणि आरोपी संतोष साखरकर यांच्यात मागील तीन ते चार वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या आरोपीने महिलेचा गळा दाबून हत्या केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. हत्येनंतर गुन्हा उघडकीस येऊ नये आणि पुरावा नष्ट व्हावा, या उद्देशाने आरोपीने महिलेचा मृतदेह चंद्रपूर येथून नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथे नेला आणि तेथे जमिनीत पुरला. चंद्रपूर शहरात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर
        १७ ऑक्टोबर २०२६ रोजी आरोपी संतोष साखरकर स्वतः चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच चंद्रपूर शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांचे पथक हिंगणा येथे रवाना झाले. हिंगणा येथे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्या उपस्थितीत आवश्यक पंचनामा करण्यात आला. त्यानंतर जमिनीत पुरलेला महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची ओळख पटविण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.

        या प्रकरणी आरोपी संतोष साखरकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०३(१) आणि २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, हत्येची पार्श्वभूमी, घटनाक्रम आणि पुरावा नष्ट करण्याच्या कथित प्रयत्नांबाबत पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणातील कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक शाम गव्हाणे, सहायक पोलीस निरीक्षक युवराज सहारे, पोलीस हवालदार राकेश फुकट तसेच पोलीस अंमलदार मोरेश्वर शिंदे, रोशन भोईंकर आणि लीना काठवले यांनी सहभाग घेतला. चंद्रपूर शहरातील या प्रकरणामुळे प्रेमसंबंधातील वादातून घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस करीत आहेत.

#Chandrapur #ChandrapurNews #ChandrapurCrime #ChandrapurPolice #ChandrapurCity #NagpurNews #Hingna #CrimeNews #MaharashtraNews #MaharashtraCrime #चंद्रपूर #चंद्रपूरबातम्या #चंद्रपूरपोलीस #चंद्रपूरगुन्हे #महिलाहत्या #हत्याप्रकरण #नागपूरबातम्या #हिंगणा #आमचाविदर्भ

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top