Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: छट पूजा भक्तिभावाने साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अशोक राव - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - उत्तर भारतीय समाजात कार्तिक शुक्ल षष्टीला भक्तिभावाने छट पूजा साजरी करण्यात आली. छटपूजेनिमित्त वर्...
अशोक राव - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -

उत्तर भारतीय समाजात कार्तिक शुक्ल षष्टीला भक्तिभावाने छट पूजा साजरी करण्यात आली. छटपूजेनिमित्त वर्धा नदीच्या घाटावर आरती करण्यात आली. यानिमित्त नदी संवर्धनाचा संकल्पही करण्यात आला.  या वेळी कार्यकारी नगराध्यक्ष सुनील देशपांडे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अशोक राव यांनी सूर्य देवाला अर्घ देऊन दिवा अर्पित करण्यात आला.
"छट पूजा" हि उत्तरभारतातील स्त्रीया करिता असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे. छटव्रत स्वीकारून हि पूजा करण्यात येते. या व्रतदारम्यान स्त्रिया निर्जल उपवास करतात व सूर्याला अर्घ देऊन हा उपवास सोडतात. हा व्रत सौभाग्य, समृद्धीसाठी करण्यात येतो. सायंकाळी सहाच्या मुहूर्तावर भाविकांनी सूर्यनारायणाला अर्ध्य दिले. दिवाळीनंतर सहाव्या दिवशी सूर्य नारायणाची उपासना आणि पूजा करून गुणगाण गायले. या वर्षी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता अभियान राबविले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी युवकांनी पुढाकार घेतला.




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top