- राजुरा तालुक्यातील सिंधी शिवारातील घटना
- वाचा सविस्तर वृत्त...
विरूर स्टेशन - (राजुरा) -
शेतालागत असलेल्या नाल्यावर पाणी भरण्याकरिता गेले असलेल्या बाप लेकीला जिवंत विद्यूत शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना राजुरा तालुक्यातील सिंधी शिवारात घडली असून स्वनिल सत्यपाल चाहारे वय ३२ तर सेजल स्वप्नील चाहारे वय ७ वर्षे असे मृतकांचे नावे आहेत सदर मृतक हा आपल्या वडीलाला एकुलता एक होता तर मृतक मुलगी ही आई वडिलांना एकुलती एक असल्याने सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सविस्तर असे की, नेहमी प्रमाणे स्वप्नील हा आपल्या वडिलां सोबत शेतात काम करण्याकरिता सिंधी शिवारात असलेल्या आपल्या शेतात आला, कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्याने सोबत त्याची मुलगी सेजल ही सुद्धा सोबत आली. शेतालागत नाला असल्याने पाणी भरण्यासाठी नाल्यावर आला असता नाल्यावर लागून असलेलं पाण्याचे मोटर पपं ला जिवंत विदूत प्रवाह सुरू होता. मुलगी पाणी पाहून खेळण्यासाठी पाण्यात उतरली असता तिला पाण्यात विदूत प्रवाह सुरू असल्याने तिला शॉक लागून ती खाली पडली. दरम्यान मुलीला वाचविण्यासाठी गेलेल्या स्वप्नील ला ही शॉक लागल्याने तो जागीच ठार झाला.
बराच वेळ होऊन परत आले नाही म्हणून स्वप्नील चे वडील सत्यपाल हे घटनास्थळी आले असता दोघेही पाण्यात पडून दिसले, त्यावेळी आरडाओरड केली असता बाजूचे शेतकरी येऊन घटनेची स्थिती पाहता मोटार पंप चे वायर तोडून त्यांना बाहेर काढण्यात आले.
घटनेची माहिती विरुर पोलीस स्टेशनला मिळताच सदानंद वडतकर, पोलीस निरीक्षक विरुर ,पवार मेजर, मुंडे, जाधव यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन साठी राजुरा येथे पाठविण्यात आले आहे. समोरील तपास सुरु आहे.







टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.