- गोंडपिपरी तालुक्यातील येनबोथला येथे मानव जातीला काळीमा फासणारी घटना
- १२ तासाच्या आत नराधमास गोंडपिपरी पोलिसांनी पकडले
गोंडपिपरी तालुक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर येनबोथला येथील रहिवासी यांच्या वडिलांचे काल निधन झाले. दुपारी अंत्यविधी पार पडल्यानंतर रात्री नऊच्या सुमारास घरातील मंडळी अंत्यविधी ला आलेल्या पाहूण्यासह घरी जेवण करायला बसले असताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या काकाने आपल्याच अल्पवयीन पुतनी हिच्यावर वासनेची काळी नजर ठेवली. पाहुण्याला जेवण देत असताना सदर मुलगी घरातून बाहेर निघाली असता कोणाचेही लक्ष नसल्याची संधी साधत आरोपी वय २६ याने तिला ओढत घराजवळच असलेल्या सांदवाडीत नेले व अंधाराचा फायदा घेत तिच्यावर बळजबरी करून बलात्कार केला. काही वेळात मुलीचे वडील हे घराबाहेर लघुशंकेला निघाले असताना त्याला आपल्या मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने मुलीचे वडील गेले असता घटनास्थळावरून आरोपीने पळ काढला. मुलीची अवस्था पाहून वडील चक्रावून गेले, तिला घरी आणत तिला विचारपूस केली असता काकाने आपल्यावर बळजबरीने ओढत नेत बलात्कार केल्याची माहिती तिने घरच्यांना दिली. एवढंच नाही तर पावसाळ्यात यापूर्वी देखील आरोपीने शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता व ही माहिती कुणाला सांगितली तर तुला जीवे मारेल अशी धमकी सुद्धा दिली होती त्यामुळे भीतीपोटी मुलीने आपल्या काकाचे काळे कृत्य घरच्यांना सांगितले नाही. मुलीवरती झालेला अत्याचार पाहून आई-वडिलांनी लगेचच रात्री अकरा वाजता गोंडपिपरी कडे धाव घेत पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संदीप धोबे यांनी आपल्या सहकार्यांसह येनबोथला गाव गाठले व गावा पासून एक किलोमीटर असलेल्या पाण्याच्या टाकी जवळ लपून असलेल्या आरोपीलाला ताब्यात घेत त्याच्यावरती गुन्हा दाखल केला. पीडित मुलीला मेडिकल करण्याकरिता नेण्यात आले. पोलिसांनी आरोपी विरुद्ध ३७६,३७६(२)(I)(N)(F)५०६,४,६ कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोस्को टीम कडे तपास दिला आहे सदर घटनेची माहिती मिळताच मूलचे उपविभागीय अधिकारी अनुज तरे यांनी घटनास्थळी भेट देत प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी गोंडपिपरी चे ठाणेदार संदीप धोबे, पोलीस कर्मचारी अनिल चव्हाण, विलास जाधव, प्रेम चव्हाण, कोसनशिले उपस्थित होते. सदर घटनेची तालुक्यात निंदा होत असून घडलेल्या अमानुष कृत्याबाबत सर्वत्र निषेध केल्या जात आहे.







टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.