- वाटेकर कुटुंबाने दिला सामाजिक परंमपरेला फाटा
स्वर्गीय शंकरराव वाटेकर यांचे दुःखद निधन नुकतेच झाले. वडिलांची तेरवी न करता सामाजिक परंमपरेला फाटा देऊन बाळू संकल्पनेतून 10 कुपोषित बालकांना बाळू पोषण आहारा ची भेट वाटेकर कुटुंबाने देऊन सामाजिक कर्तव्य पार पाडले. साई मंदिर बामनवाडा चे अध्यक्ष अरुण वाटेकर यांचे वडील स्वर्गीय शंकरराव वाटेकर यांना याप्रसंगी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बाळू चे संस्थापक अध्यक्ष अमित महाजनवार, बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली सटाले, अरुण वाटेकर, नप प्रशासकीय अधिकारी विजयराव जांभुलकर साहेब, अनिल पुरटकर, राहुल वाटेकर, रूपा वाटेकर इत्यादी उपस्थित होते. या प्रसंगी सर्व बाळू भेट बालकांना अंगणवाडी सेविका मार्फत पोहचविण्याची जवाबदारी सटाले मॅडम यांनी स्वीकारली. भविष्यात पुन्हा कुपोषितांना बाळू भेट ची गरज भासल्यास आम्ही सामोरे येऊ अशी ग्वाही वाटेकर कुटुंबाने दिली.







टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.