- शेकडो रक्तदात्यांनी केले रक्तदान
- जय भवानी कामगार संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाचा पुढाकार
गडचांदूर -
२ ऑक्टोबर परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस म्हणून पाळला जातो. या दिनाच्या औचित्याने जय भवानी कामगार संघटना व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या पुढाकाराने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन क्रांतिवीर लहुजी साळवे शाळा नांदा (फाटा) या ठिकाणी करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुरज ठाकरे, समाजसेवक डॉ. गिरीधर काळे व अन्य मान्यवर उपस्थित होते. यादरम्यान जय भवानी कामगार संघटनेचे सचिव रोशन हरबडे व नितेश बेरड यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. रक्तदान जीवनदान समजून परिसरातील शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान केले.







टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.