Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दिलासादायक बातमी - एकही मृत्यू नाही
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
24 तासात नव्या 145 बाधितांची नोंद बरे होणाऱ्या बाधितांची संख्या जास्त आतापर्यंत 10036 बाधित कोरोना मुक्त उपचार घेत असलेले बाधित 2 हजार 994 ज...

  • 24 तासात नव्या 145 बाधितांची नोंद
  • बरे होणाऱ्या बाधितांची संख्या जास्त
  • आतापर्यंत 10036 बाधित कोरोना मुक्त
  • उपचार घेत असलेले बाधित 2 हजार 994
  • जिल्ह्यात बाधितांची संख्या 13 हजार 227
  • चंद्रपूर जिल्हा कोरोना अपडेट्स
  • वाचा सविस्तर....
आमचा विदर्भ
श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -

जिल्ह्यात कोरोनातून बरे होणाऱ्या बाधितांची संख्या उपचार घेणाऱ्या बाधितांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत 10 हजार 036 बाधित कोरोना मुक्त झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर उपचार घेत असलेले बाधित 2 हजार 994 आहे. गेल्या 24 तासात नव्याने 145 बाधितांची नोंद झाली असून 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू झालेला नाही.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत 197 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 187, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ चार आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 78, बल्लारपुर तालुक्यातील तीन, पोंभूर्णा तालुक्यातील एक, चिमूर तालुक्यातील एक, मुल तालुक्यातील आठ, जिवती तालुक्यातील तीन, ब्रह्मपुरी तालुक्यातील 17, नागभीड तालुक्‍यातील 12, वरोरा तालुक्यातील दोन, भद्रावती तालुक्यातील एक, सावली तालुक्यातील तीन, सिंदेवाही तालुक्यातील 12, गडचिरोली येथील चार असे एकूण 145 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहर व परिसरातील जलनगर, शास्त्रीनगर, तुकूम, इंदिरानगर, कृष्णनगर, घुटकाळा वार्ड, भिवापूर वार्ड, बाबुपेठ, सिविल लाइन, नगिनाबाग, श्रीराम वार्ड, अंचलेश्वर गेट परिसर, विजय नगर, भाना पेठ वार्ड, मेजर गेट परिसर, ऊर्जानगर, बालाजी वार्ड, जीएमसी परिसर, गंज वार्ड, जटपुरा गेट परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:
भद्रावती तालुक्यातील शिवाजीनगर भागातून बाधित पुढे आले आहे. सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही, पेठगांव परिसरातून बाधित ठरले आहे. नागभीड तालुक्यातील गिरगाव, आलेवाही, भगतसिंग चौक, तळोदी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

वरोरा तालुक्यातील गांधी वार्ड, कर्मवीर परिसरातून बाधित ठरले आहे. बल्लारपूर तालुक्यातील राणी लक्ष्मीबाई वार्ड, दहेली भागातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील श्रीनगर, उदापूर, शांतीनगर, सुंदर नगर, कुर्झा, हळदा, विद्यानगर, देऊळगाव, झाशी राणी चौक परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

मुल तालुक्यातील वार्ड नंबर सहा, वार्ड नंबर 11, वार्ड नंबर 14, वार्ड नंबर 16, जुनासुर्ला भागातून बाधित पुढे आले आहे. सावली तालुक्यातील चकपिरंजी भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top