शैलेश कोरांगे - प्रतिनिधी आमचा विदर्भ
कोरपना -
कोरपना येथे गतवर्षी पासुन युवकांच्या समस्या सोडण्यासाठी व समाजसेवचे कार्य करण्याकरिता कोरपना येथील युवा प्रतिष्ठाण हा ग्रुप विविध कार्यक्रम आयोजित करून युवकांच्या सुप्त गुणांना वाव देत आहे. युवकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून युवा प्रतिष्ठान ग्रुप कार्य करीत आहे.
समाजातील वंचित युवकांना योग्य मार्गदर्शन मिळावे याकरिता वेळोवेळी युवा प्रतिष्ठान द्वारे मार्गदर्शन सुद्धा युवकांना मिळत आहे. त्यामुळे युवक एकमेकांस सहाय्य्य करीत आहे. युवकांचे आरोग्य सुदृढ राहावे हे उद्दात्त धोरण सामोरे ठेऊन आज युवा प्रतिष्ठान द्वारा संचालित युवा फिटनेस क्लब चा लोकार्पण सोहळा थाटात पार पडला. कोरपना येथील पोलीस निरीक्षक गुरुनुले साहेब यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे मिन्नाथजी पेटकर महाराज प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच शेकडो युवक सुद्धा उपस्थित होते.










टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.