Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आरटीवन वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने वेगळीच शक्कल
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वाघाला पकडण्यासाठी दोन पिंजरे पिंजऱ्यात आळीपाळीने 16 वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर बसणार मुख्य पिंजऱ्याचा दरवाजाला बांधलेली दोरी पिंजऱ्यात बसलेल...

  • वाघाला पकडण्यासाठी दोन पिंजरे
  • पिंजऱ्यात आळीपाळीने 16 वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर बसणार
  • मुख्य पिंजऱ्याचा दरवाजाला बांधलेली दोरी पिंजऱ्यात बसलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या हातात.....
  • वाचा सविस्तर....
अनंता गोखरे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी 
राजूरा -
दहा लोकांचा बळी घेणाऱ्या आर.टी.वन. वाघाला पकडण्यासाठी वनविभागाचे शर्तीचे प्रयत्न सूरू असून सतत हुलकावणी देणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने आता सापळा रचला आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. यासाठी चक्क पिंजऱ्यामध्ये वनपाल, वनमजूरांना बसविण्यात आले आहे.

तर दुसऱ्या पिंजऱ्याची दोरी पिंजऱ्यात बसलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या हातात असणार आहे. वाघ पिंजऱ्याचा आत शिरताच ही दोरी ओढली जाणार आहे. दोरी ओढताच पिंजऱ्याचा दरवाजा बंद होणार आणि वाघ पिंजऱ्यात अडकणार आहे. यात वनपाल, वनरक्षकांच्या जीवितास धोका नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत असले तरी वनविभागाच्या या थरारक खेळीने वनमजूर, वनपालांचे कुटूंब हादरले आहे.राजूरा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या आर.टी.वन. वाघाने आतापर्यंत दहा जणांचे बळी घेतले आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी जंगलात 160 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तसेच 200 वन कर्मचाऱ्यांचा ताफा जंगलात गस्त घालत आहेत. वाघाला बेशुध्द करण्यासाठी दोन शुटरही तैनात करण्यात आले आहेत. दिवस-रात्र वन कर्मचारी वाघावर लक्ष ठेऊन आहेत. मात्र, प्रत्येक वेळी हा वाघ हुलकावणी देत आहे. वनविभागाने वाघाला आकर्षित करण्यासाठी पिंजऱ्यात जनावरेही ठेवली होती. मात्र, त्याचाही काही उपयोग झाला नाही. तर दुसरीकडे वाघाला ठार करा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली आहे. या वाघाचा तत्काळ बंदोबस्त करा, या मागणीसाठी शेतकरी, शेतमजूरांनी रास्ता रोको आंदोलनही केले. त्यामुळे वनविभागावर दबाव वाढला आहे. यातूनच वनविभागाने आता "जिवघेणी" खेळी खेळली आहे.वाघाला पकडण्यासाठी दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. वाघाला पकडण्यासाठी मुख्य पिंजरा असणार आहे. या पिंजऱ्यापासून 30 ते 40 मिटर अंतरावर उंच ठिकाणी दुसरा पिंजरा ठेवला गेला आहे. या पिंजऱ्यात आळीपाळीने 16 वनपाल, वनरक्षक आणि वनमजूर बसणार आहेत. मुख्य पिंजऱ्याचा दरवाजाला बांधलेली दोरी पिंजऱ्यात बसलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या हातात असणार आहे. मुख्य पिंजऱ्यात वाघ येताच ही दोरी ओढली जाईल. दोरी ओढताच मुख्य पिंजऱ्याचा दरवाजा बंद होईल आणि वाघ पिंजऱ्यात अडकेल. दुसरा पर्याय म्हणून जाळीसुद्धा बांधण्यात आली आहे. या योजनेत पिंजऱ्यात बसलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या जिवाला कुठलाच धोका होणार नसल्याचे वनविभागाचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top