Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एक गाय जखमी तर सहा गायी बेपत्ता
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच अनंता गोखरे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी राजुरा - राजुरा तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच असून वाघाला ...

  • राजुरा तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच
अनंता गोखरे - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
राजुरा -

राजुरा तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरूच असून वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या अनेक तुकड्या गस्त घालत असतानाच पुन्हा वाघाचा हल्ला झाला आहे. माळरानावर चरणाऱ्या गायींच्या कळपावर वाघाने हल्ला केला असून त्यात एक गाय जखमी झाली, तर घाबरलेल्या सहा गायी इतरत्र पळून गेल्या आहेत.

वाघाने तालुक्यातील दहा शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेतला आहे. वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या अनेक तुकड्या गस्त घालत आहेत. मात्र, अद्यापही वनविभागाला वाघ गवसला नाही. दुसरीकडे सतत होणाऱ्या वाघाच्या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वाघाला गोळ्या घालण्याची मागणी होत असतांना तालुक्यातील मानोली येथील रमेश महादेव अडवे हे काल दि. १६ ऑक्टोबर ला आपल्या सात गायींना चरण्यासाठी गोवरीपासून जवळच असलेल्या नाला परिसरात घेऊन गेले होते. नाल्यात दबा धरून बसलेल्या वाघाने गायींच्या कळपावर हल्ला केला. यात एक गाय वाघाच्या तावडीत सापडली. मात्र, तिने वाघाच्या तावडीतून कशीबशी आपली सुटका करून गावाचा रस्ता धरला. तर, इतर सहा गायी या हल्ल्याने गोंधळून इतरत्र पळाल्या. त्या सहा गायी अद्यापही घरी आल्या नाहीत. रमेश अडवे यांनी गावातील काही सोबत्यांना घेऊन गायींचा शोध सुरू केला आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. 










About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top