- शिरपूर येथे व्यायाम शाळेचा उद्घाटन सोहळा संपन्न
कुरखेडा -
आजच्या धकाधकीच्या जीवनात ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती ला नोकरी व्यवसाय ची गरज आहे, त्या प्रमाणे शरीर स्वास्थ्यासाठी व्यायामाची हीच गरज आहे, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी शिरपूर येथे दि. १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या व्यायाम शाळेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी केले. ते कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलत होते .
पुढे बोलताना शहरी भागात ही सोय असते, पण ग्रामीण भागातील व्यक्ती साठी अशी सोय होणंही गरजेचे आहे. ज्याचा फायदा तरुणान पासून वृद्ध, महिला वर्गांना होईल. आपण ग्रामीण भागात व्यायाम शाळांना आधी पासून प्राधान्य देण्याचं काम केले व पुढेही अश्याच प्रकारे प्रयत्नशील राहू. व्यायाम केल्याने फक्त शरीराच नाही तर नैराश्य, भीती व तणाव वाढत चाललेला आहे. अशा स्थितीत जर युवकांनी, वृद्धांनी किंवा महिलांनी योगसाधना केली तर त्याचा चांगला फायदा होईल. योगामुळे व्यसनी व्यक्तीला असामान्य अशी शक्ती मिळत जाते. ही शक्ती तो व्यसनमुक्त राहण्यासाठी आणि अधोगतीकडे चाललेले जीवन प्रगतिपथावर नेण्यासाठी वापरू शकतो. यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच तरुण युवक उपस्थित होते.










टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.