Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: दोन संगणक व तिन प्रिंटर चोरणाऱ्या आरोपीस चिमूर पोलीसांनी केली अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
स्वामी विवेकानंद आयटीआय येथून केली होती चोरी मनोज सोगलकर - आमचा विदर्भ विशेष प्रतिनिधी चिमूर - पोलीस स्टेशन चिमूर हद्दीतील स्वामी विवेकानंद ...

  • स्वामी विवेकानंद आयटीआय येथून केली होती चोरी
मनोज सोगलकर - आमचा विदर्भ विशेष प्रतिनिधी
चिमूर -

पोलीस स्टेशन चिमूर हद्दीतील स्वामी विवेकानंद आयटीआय येथे 4 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर च्या रात्री रात्रौ दरम्यान आयटीआयत प्रवेश करून अज्ञात चोरटयांनी संगणक, प्रिंटर व इतर साहित्य असा 52 हजाराचा मुद्देमाल चोरी केला होता. फिर्यादी कुंदन तपासे यांनी तशी रिपोर्ट दिली असता पोलीस स्टेशन चिमूर येथील ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी चिमूर भागात आपली गोपनीय यंत्रणा राबवून चिमूर येथील आरोपी सौरभ मनोहर चांदेकर 20, प्रतीक ताराचंद मत्ते 21, स्वप्नील रामकृष्ण बंडे 23 सर्व रा चिमूर यांना ताब्यात घेऊन कसोशीने व चाणाक्ष बुद्धीचा वापर करून विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुली दिली. पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेऊन त्यांचे कडून दोन दोन संगणक व तिन प्रिंटर असा 52 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन बगाटे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे, पोहवा विलास निमगडे, सचिन खामनकर, सचिन गजभिये, विनायक सरकुंडे, सतीश झिलपे यांनी केली.  









About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top