Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नेहल भादंक्कर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी चंद्रपूर - भारतीय जनता युवा मोर्चाचे चंद्रपूर शहरातील नेहल भादंक्कर यांनी आपला वाढदिवस विविध सामाजिक कार्य करु...

मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -

भारतीय जनता युवा मोर्चाचे चंद्रपूर शहरातील नेहल भादंक्कर यांनी आपला वाढदिवस विविध सामाजिक कार्य करुन साजरा केला.नेहल भांदक्कर यांनी स्वर्ईच्छेने नेत्रदान (डोळे) शासकीय नेत्र संकलन केंद्र सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे मरणोपरांत करीत आहे.हे डोळे अंध व्यक्तींना दृष्टी येण्याकरीता तसेच नेत्र संशोधनाकरीत संमती दिले आहे.तसेच चंद्रपूर शहर रामनगर पोलिस स्टेशन कोरोना योध्दे असणाऱ्या पोलिस बांधवांना १०० मास्क चे वाटप करण्यात आले याचप्रमाणे रक्तदान माहादान करून वाढदिवस साजरा केला.तसेच नानाजी नगर परिसरात वृक्षारोपण करुन सामाजिक बांधिलकी जोपासत वृक्ष लागवडीचा संदेश दिला याप्रकारे नेहल भादंक्कर यांनी उपमहापौर व स्थायी समिती अध्यक्ष राहुलभाऊ पावडे यांचा आदर्श समोर ठेवून विविध सामाजिक कार्य करत आपला वाढदिवस साजरा केला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top