Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चिमूर क्रांती सांस्कृतीक लोककला मंडळ चिमूर च्या वतीने सांस्कृतिक मंत्रालय मुबई यांना उपविभागीय अधिकारी मार्फत दिले निवेदन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी चंद्रपूर - कोरोना काळात कलावंतांच्या कार्यक्रमावर पूर्णतः बंदी होती यातच अनेक कलाकारांच्या कुटुंबाचे उदरनिर्वा...

मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -

कोरोना काळात कलावंतांच्या कार्यक्रमावर पूर्णतः बंदी होती यातच अनेक कलाकारांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाचे साधन कला हीच होती पण तीच त्यांच्या हाती नाही तर शासनाने याकडे लक्ष केंद्रित करून कलावंतांना मानधन जाहीर करावे अशी मागणी चिमूर क्रांती सांस्कृतीक लोककला मंडळ चे अध्यक्ष शंकर रामटेके यांनी केले. 

देशात सर्वत्र कोरोना महामारीने कहर केला असून देशाला हादरा दिला. अशातच शासन आणि प्रशासनाने वेळीच जागृकता दाखवून वेळोवेळी लाकडाऊन करून जनतेला सतर्क रहा व घरीच रहा असा इशारा दिला व कोरोना या विषाणूजन्य रोगाची जनसामान्य माणसात जनजागृती केली. परंतू ग्रामीण भागातील लोक कलावंताचे कार्यक्रम उदा. नाट्य, खडीगमत, कलापथक, पथनाट्य, कीर्तन, भजन, भारुड, हरिपाठ, गोधड, डहाका, दडांर असे अनेक समाज प्रबोधनपर कार्यक्रम कोरोनाच्या महामारीत बंद करण्यात आले. त्यामुळे अनेक लोक कलावंताला व त्याच्या कुटुंबातील व्यक्तीला आपल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न डोळ्या समोर उभा झाला आहे. 

अनेक महिन्या पासून काही कलावंताचे मानधन सुद्धा थकीत असल्याने तर काही लोक कलावंताच्या फाईली पंस कार्यालयात पेंडीग पडल्या असून या सर्व कलावंतावर उपासमारीची पाळी आली आहे. या सर्व समस्याचे निवेदन ग्रामीण लोककलावंताच्या मार्फत मा सांस्कृतिक मंत्रालय मुबई यांना उपविभागीय अधिकारी याना देण्यात आले.

निवेदन देत असताना शंकर प्रल्हाद रामटेके अध्यक्ष कोटगाव, हरीचंद्र परसराम सोरदे उपाध्यक्ष नवेगाव पेठ, रतीराम शंकर डेकाटे, सचिव कोलारा, श्रीकृष्ण जानबा नन्नावरे, सहसचिव एकनाथ तुळशीराम बोरकर, कोषाध्यक्ष पंढरी शामराव धोंगडे, केशव डोमाजी वरखेडे, शंकर उरकुडा सोनवाणे, दामोदर श्रीहरी बोरकर, सुखदेव गंगाराम धारने , पुडलीक तुळशीराम राणे, रत्नमाला नानाजी सोनूले, मनीषा राजेश्वर श्रीरामे, इंदिरा भास्कर नैतांम, शीला भरत जांभूळे व अशा अनेक भजन मंडळांनी सदस्य चिमूर तहसील कार्यालय मध्ये  निवेदन देत असताना उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top