अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
संजय गांधी निराधार योजने अंतर्गत फार्मवर नगर परिषद राजुरा येथील अधिक्षक यांची सही घेण्यासाठी सुमन वसंता सोयाम या स्वत: गेल्या असता तिचे अर्वाच्य भाषेत स्वागत करून जास्त बोलल्यास पोलिसांना बोलविण्याची धमकी दिली गेली होती. महिलेने श्रमीक एल्गार च्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधत आज नगर परिषद मध्ये धडक दिली. जनसामान्यांसाठी धावून जाणारे विकासपुरुष नगराध्यक्ष अरूणभाऊ धोटे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोषी अधिकाऱ्यांना सर्वसामान्यांशी सौजन्याने वागा अशी तंबी दिली. मागील सहा महिन्यापासून कोरोना सदृश्य परिस्थितीत अत्यंत तणावात कार्यालयीन कर्मी कार्य करीत असल्यामुळे अवधानाने काही अपशब्द निघाल्यास मी क्षमा मागतो म्हणत दोषी अधिकाऱ्याने दिलगिरी व्यक्त केली व प्रकरण निवळले.
यावेळी श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष तथा आदिवासी न्याय हक्क परिषदेचे केंद्रीय संयोजक घनशाम मेश्राम, आदिवासी न्याय हक्क परिषदेचे केंद्रीय संयोजक संतोष कुळमेथे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे राजुरा तालुका सचिव दीपक मडावी, अभिलाष परचाके, तुळशीराम किन्नाके, पवन ताकसांडे, आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुनील मुसळे , जिल्हा उपाध्यक्ष परमजित सिंग झगडे, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष रोशन येवले, सुमन सोयाम, गंगा टेकाम, भविका मेश्राम, शैलेजा टेकाम, शीतल सिडाम, उषा लोखंडे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.