Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टी व श्रमीक एल्गार चे धरणे आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जीवित तथा पीक हानी ची नुकसान भरपाई त्वरित द्या - रोशन येवले अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी राजुरा - आम आदमी पार्टी शाखा राजुरा च्या वतीने आज...

  • जीवित तथा पीक हानी ची नुकसान भरपाई त्वरित द्या - रोशन येवले
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -

आम आदमी पार्टी शाखा राजुरा च्या वतीने आज नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करणे किंवा ठार मारणे, वाघाच्या ‌हल्लात जखमी व मृत पावलेल्या व्यक्तींना उचित आर्थिक लाभ मिळवून देणे. पिडीत कुटुंबातील एकाला नोकरी मिळवून देणे. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा मिळवून देणे. तसेच 

राजुरा येथील निराधार महिला सुमन सोयाम हिला न्याय मिळवून देण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन तहसिल कार्यालय, राजुरा समोर करण्यात आले. यावेळी आपचे तालुकाध्यक्ष रोशन येवले यांनी वाघाला त्वरित जेरबंद किंवा शूट करण्याची मागणी केली. 

आप चे जिल्हा संयोजक सुनिल मुसळे यांनी आतापर्यंत वाघाच्या बंदोबस्त संबंधाने आपण काय पाठपुरावा केला याची माहिती मागितली. ती देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच वाघाला जेरबंद करण्याचे आणि मारण्याचे अधिकार आम्हांला नाहीत असे सांगितले. यासाठीची समिती याबाबत योग्य ती कारवाई करेल असे सांगितले. आंदोलनाच्या यशस्वीतेकरिता आम आदमी पार्टी राजुरा चे संयोजक रोशन येवले, श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम, संतोष तोगर, सुरेश लोखंडे, पवन ताकसांडे, सुभाष बोरकुटे, स्वप्निल कोहपरे, तुळशिराम किन्नाके यांचे सहकार्य लाभले. आप चे जिल्हा संयोजक सुनिल मुसळे, जिल्हा संघटन मंत्री परमजीतसींग झगडे, कोषाध्यक्ष भिवराज सोनी, जेष्ठ सदस्य मिलिंद गड्डमवार तसेच श्रमीक एल्गार चे संतोष कुळमेथे, दीपक मडावी, अभिलाष परचाके, सुमन सोयाम, गंगा टेकाम, भविका मेश्राम, शैलजा टेकाम, शितल सिडाम, उषा लोखंडे, प्रतिभा मत्ते यासह शेकडो महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top