- श्री भवानीमाता देवस्थानाची नवरात्र विषयी नियमावली जाहीर
- गर्भगृहात प्रवेश नाही, दर्शन रांगांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम
राजुरा -
कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन नवरात्रौत्सव, दुर्गापूजा आणि दसऱ्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने स्थानिक श्री भवानी माता देवस्थानच्या ची कार्यकारणी बैठक माजी आमदार एड. संजय धोटे यांचे अध्यक्षतेखाली, नगराध्यक्ष अरुण धोटे, उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली. दरवर्षी प्रमाणे "नवरात्री" मध्ये होणारे, सर्व सार्वजनिक कार्यक्रम कोविड-9 मुळे रद्द करण्याचे ठरविण्यात आले आहे. पारंपरिक नित्य पुजा-अर्चा गरीचे बंधन पाळून करण्यात येणार आहे.
या नियमांचे करावे लागणार आहे पालन -
- सभा मंडपा मध्ये एका वेळी 5 महिलांना प्रवेश देण्यात येईल, मास्क शिवाय प्रवेश नाही.
- ओटी भरण्या करिता देवीचे गर्भगृहात प्रवेश राहणार नाही. सभा मंडपाचे द्वारातून श्री देवीचे दर्शन पुजा व ओटी देता येईल.
- दररोज होणाऱ्या आरती नंतर प्रसाद वितरण मंदिर तर्फे किंवा इतरांन तर्फे मंदिर प्रांगणात करता येणार नाही.
- मंदिर प्रांगणात दरवर्षीच्या "दांडिया" कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
- रावण दहन या वर्षी रद्द करण्यात येणार नाही.
- दरवर्षीचा महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
या बैठकीत कार्यकारिणी मंडळाचे प्रकाश बेजंकीवार, किरणसिंह चव्हाण, अरुण भोयर, अनिल येगीनवार, देविदास चव्हाण, हरीचंद्र पायघन, सुभाष रामगिरवार, राजु पिपंळकर, रमेश सारडा हे उपस्थित होते. या नियमावलींची नोंद घेण्याची विनंती देवस्थान समिती ने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.