- बल्लारपुरात काँग्रेसची व्हर्चुअल रॅली
- मान्यवरांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने राज्य भर शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात व्हर्च्युअल रॅली आयोजित केली जात आहे. या मालिकेत बल्लारपूर येथे व्हर्च्युअल रॅली घेण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना मान्यवर बाेलत होते.
यावेळी तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी म्हणाले, केंद्र सरकार शेतकरी व कामगार विरोधी भूमिका घेत आहे. लाेकशाही प्रक्रिया पायदळी तुडवून हुकूमशाही लादत आहे. शेतकरी विरोधी काळा कायदा लागू करून पिळवणूक करत आहे. नव्या शेतकरी विरोधी कायद्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था धुळीला मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे. भारताच्या अन्नदात्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. यासाठी आंदोलनाचा मार्ग स्विकारला आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा आहे, असे घनश्याम मुलचंदानी यांनी सांगितले.
बल्लारपूर येथील शेतकरी विरोधी कायदा व्हर्च्युअल रॅलीत काँग्रेसचे नेते घनश्याम मुलचंदानी, माजी नगराध्यक्ष डॉ मधुकर बावणे, महिला शहर काँग्रेसच्या अध्यक्ष एड. मेघा भाले, अफसाना सय्यद, छाया शेंडे, माजी नगराध्यक्ष छाया मडावी, अनिल खरतड, प्राणेश अमराज, माजी नप गट नेते देवेंद्र आर्य, इस्माईल ढाकवाला, डॉ युवराज भसारकर यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती हाेती.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.