- शैलेश लांजेवार यांची शहर अध्यक्षपदी नियुक्ती
- NSUI चे जिल्हाध्यक्ष स्वप्निल तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली नेमणूक
रमेश निषाद - प्रतिनिधी
बल्लारपुर -
काँगेस संगठन ला बळकट करण्यासाठी व राहुल गांधींच्या विचार जनसामान्यात रुजविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांवरील अन्याय संपवण्यासाठी बल्लारपूर येथे NSUI ची तालुका व शहर नवीन कार्यकारणी गठीत करण्यात अली. यावेळी NSUI चे जिल्हाध्यक्ष स्वप्निल तिवारी यांच्या मार्गदर्शनात व युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष चेतन गेडाम यांनी दानिश शेख यांना विधानसभा अध्यक्ष, शैलेश लांजेवार शहर अध्यक्ष, जॉन कनकुटला विधानसभा महासचिव, काशी मेगनवार शहर उपाध्यक्ष, चंचल मुन शहर सचिव या पदावर नियुक्ती केली. याप्रसंगी NSUI चे जिल्हा महासचिव संदीप नक्षिणे, समीर खान, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष शफाक शेख, प्रतिक तिवारी, निहार शेख आदी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.