- दिवसेंदिवस अवजड वाहनांच्या संख्येत वाढ
- संबधित विभागाचे दुर्लक्ष : नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास
गडचांदूर -
कोरपना तालुक्यातील गडचांदूर परिसरात मोठमोठे सिमेंट कारखाने असून वाहनांची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात दिसून येते. गडचांदूर-नांदा (फाटा) या रस्त्यावरून अवजड वाहने ये-जा करीत असल्याने रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे रस्त्याने आवागमन करणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
गडचांदूर-बिबी-नांदा (फाटा) या परिसरात अल्ट्राटेक सिमेंट कंपनी असल्याने रस्त्यावर वाहतुकीची वर्दळ वाढली असून रात्रंदिवस सुरु असलेल्या अवजड वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून बिबी गावालगत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीने लगतच्या घरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनचालकांचे अपघात झाले आहे तर अनेकांच्या वाहनांचे नुकसान होत आहे. परिसरातील नागरीक या रस्त्यावर सकाळी फिरायला जातात, शेतकरी शेतांत जातात, यामुळे सदर मार्गावर अपघाताची भीती वाढली असून या रस्त्याने आवागमन करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. यामुळे संबंधीत विभागाने रस्ता दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.