मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
गडचिरोली -
आज 2 ऑक्टोबर रोजी भारतीय जनता पार्टी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राच्या वतीने खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात भाजपचे अनुसुचित जमाती मोर्चा चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा खासदार अशोक नेते व गडचिरोली च्या नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्य, अहिंसा, समानता, न्याय या तत्वांच्या माध्यमातून स्वातंत्र प्राप्तीसाठी अथक परिश्रम घेणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान या घोषणेने देशाच्या इतिहासात कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी खासदार अशोक नेते, नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
यावेळी जिल्हा महामंत्री नगरसेवक प्रमोदजी पिपरे, आदिवासी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, किसान मोर्चा चे प्रदेश सदस्य रमेशजी भूरसे, जिप च्या समाजकल्याण सभापती रंजिताताई कोडाप, जिल्हा उपाध्यक्ष डॉ भारत खटी, नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, भाजपचे गडचिरोली शहरअध्यक्ष तथा नगरसेवक मुक्तेश्वरजी काटवे, नप सभापती निताताई उंदिरवाडे, माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रणय खुणे, भाजयुमोचे माजी जिल्हा महामंत्री संजय बारापात्रे, भाजपचे संजयजी निखारे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, महिला आघाडीच्या पुष्पाताई करकाडे, श्रीकांत पतरंगे, तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक युवक उपस्थित होते.







टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.