चिमूर -
चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या खुर्सापार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये वाढती पटसंख्या बघता वर्गाची अडचण निर्माण होत होती तेव्हा जिल्हा परिषद उपाध्यक्ष रेखाताई कारेकर यांची दखल घेत वर्गखोलीची निधी मंजूर करून घेतले आणि १ ऑक्टोबर रोजी जिप उपाध्यक्ष रेखाताई कारेकर यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले .
चिमूर तालुक्यातील शैक्षणिक अडचणी वर मात करण्यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या मार्गदर्शनाखाली निधी देऊन कार्य सुरू असून खुर्सापार येथील इतर समस्या सुद्धा सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रेखाताई कारेकर यांनी सांगितले. खुर्सापार येथील वर्ग खोली बांधकाम साठी शासकीय जागा नव्हती तेव्हा येथील नागरिक पानसे यांनी जागा दान केली. वर्गखोलीचे भूमिपूजन प्रसंगी प्रतिष्ठित नागरिक दिलीप कुबडे, पानसे, अरुण सालेकर व अंगणवाडी सेविका उपस्थित होते.







टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.