Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: JCI राजुरा रॉयल द्वारा जागतिक हृदय दिनानिमित्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"रन अ माइल गिफ्ट अ स्माइल या कार्यक्रमाचे आयोजन" वैभव वैद्य - शहर प्रतिनिधी राजुरा - 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक ह्रदय दिवस म्हणून ...

  • "रन अ माइल गिफ्ट अ स्माइल या कार्यक्रमाचे आयोजन"
वैभव वैद्य - शहर प्रतिनिधी
राजुरा -

29 सप्टेंबर हा दिवस जागतिक ह्रदय दिवस म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. शरीरातील एक अतिशय महत्त्वाचे अंग म्हणजे ह्रदय. ह्रदय स्पंदन करून सर्व अवयवांना शुद्ध रक्त देण्याचे कार्य करत असतो त्यामुळे जर हृदय सुरळीत ठेवायाचा असेल तर प्रत्येक व्यक्तिला रोज निदान 30 मिनिटे तरी पायी चालणे किंवा धावने गर्जेचे आहे असा सल्ला डॉक्टर नेहमी देतात.

ह्रदय दिवसाचे औचित्य साधून जेसीआई राजुरा रॉयल द्वारा "रन अ माइल गिफ्ट अ स्माइल" या कार्यक्रमाचे आयोजन 29 सप्टेंबर ला शिवाजी महाविद्यालय च्या भव्य पटांगणात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राष्ट्रीय खेळाडू तसेच छत्रपति क्रीड़ा एकेडमी चे प्रशिक्षक माननीय महमूद शेख़ उर्फ़ पाशा शेख़ सर उपस्थित होते.

माननीय महमूद सर राजुरा येथे  अनेक विद्यार्थ्यना अथेलेटिक खेळाचे प्रशिक्षण देत असतात. त्यानी आपल्या मनोगतात उपस्थित सर्वाना मार्गदर्शन केले की जर शरीर निरोगी व सुदृढ़ ठेवायचे असेल तर व्यायाम नियमित करावा तसेच ह्रदय सुदृढ़ ठेवण्यासाठी निदान 30 मिनिटे चालावे किंवा धावण्याचे सर्व करावे असे सांगितले.

"रन अ माइल गिफ्ट अ स्माइल" या धावण्याच्या स्पर्धेला सुरवात करण्यात आली, या स्पर्धेत 75 स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व 1 किमी चे अंतर गाठले. नंतर सर्व स्पर्धकांना बिस्किट चे वितरण करण्यात आले.

माननीय महमूद यांच्या सहकार्याने या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, जेसीआय राजुरा रॉयल्सच्या अध्यक्षा सुषमा शुक्ला यांच्या कडून त्यांना भेट वस्तू व पुष्प देऊन त्यांचे आभार मानण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन जेसीआई राजुरा रॉयल च्या अध्यक्षा जेसी सुष्मा शुक्ला यांनी केले. प्रमुख उपस्थिती कराटे प्रशिक्षक सलमान खान, ब्राइट कॉम्पुटर चे संचालक रियाज शेख, स्वतंत्रकुमार शुक्ला, योगिता भोयर, सिद्धान्त शुक्ला, त्रिशा शुक्ला तसेच राजुरावासी व छत्रपति क्रीड़ा एकेडमिचे अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते. 









About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top