Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे वतीने थाळी वाजवा आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या घरासमोर वाजविणार थाळी मनोज सोगलकर  - विशेष प्रतिनिधी चिमूर - राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका चिमूर च्या वतीने व...

  • आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या घरासमोर वाजविणार थाळी
मनोज सोगलकर  - विशेष प्रतिनिधी
चिमूर -

राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका चिमूर च्या वतीने विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या घरासमोर दि ८ ऑक्टोबर ला थाळी वाजवा आंदोलन करण्यात येत असुन तालुक्यातील ओबीसी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका चिमूर ने केली आहे. 

महाराष्ट्र राज्यातील ५२ टक्के ओबीसी समाजाला सविंधानानुसार सोयी व सुविधा मिळाल्याचं पाहिजे या मुख्य मागणीसह विविध मागण्या करीता राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय समनव्यक डॉ.अशोक जीवतोडे व महासचिव सचिन राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील आमदार खासदार यांच्या घरासमोर थाळी आंदोलन आयोजित करण्यात आले आहे  

चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या घरासमोर राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका चिमूर थाळी वाजवून मुख्यमंत्री यांना एसडीओ मार्फत निवेदन देण्यात येणार असून तेव्हा चिमूर तालुक्यातील ओबीसी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन  राष्ट्रीय ओबीसी महासंघ तालुका अध्यक्ष गजानन अगडे,किर्ती  रोकडे, रामभाऊ खडसिंगे, प्रकाश झाडे,सौ.लता पिसे,सौ.ममता डुकरे,सौ.भावना बावनकर, राजेंद्र लोणारे, किशोर भोयर, माधुरी  रेवतकर, ईश्वर डुकरे, अक्षय लांजेवार, वैभव लांडगे, योगेश थुटे, भूषण कावरे, यांनी केले आहे

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top