- विधानसभा निवडणुकीत गोंडवाना गणतंत्र पार्टीचे काम न केल्याची व्यक्त केली खंत
राजुरा -
विरांगना महाराणी दुर्गावती मडावी जयंती दिनाच्या पुर्व संध्येला कोरपना तालुक्यातील आदर्श गांव पिपर्डा येथे ग्राम शाखेची नव्याने स्थापना करण्यात येऊन गावाच्या प्रवेशद्वारा जवळ गोंडवाना गणतंत्र पार्टी व युवा शाखा फलकांचे अनावरण करण्यात आले व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
गोंडवाना गणतंत्र पार्टी चे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष गोदरू पाटिल जुमनाके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामशाखा स्थापना व सत्कार समारंभाचे आणि गोगपा शाखा फलकांचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष बापुराव मडावी यांनी तर युवा शाखा फलकांचे उद्घाटन मेजर नामदेवराव किन्नाके यांनी केले.
प्रदेश अध्यक्ष गोदरू पाटिल यांच्या नेतृत्वावर विश्र्वास व्यक्त करून पिपर्डा येथील काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते चंपत पाटिल येळमे, लच्चू पाटिल कुळमेथे, गांव पाटिल भिमराव मडावी, बबनराव कोरांगे, युवा नेतृत्व गोविंदा कुळमेथे, संजय सोयाम, सतिश येळमे, विपुल तोडासे, अरूण येळमे, कातलाबोडी येथील खुशाल कुळमेथे, चनई (बु.) येथील सोमेश्वर कुमरे यांच्या सह अनेक समर्थकांनी गोंडवाना गणतंत्र पार्टीत केला. त्यांच्या पुष्पगुच्छ व पिवळा दुपट्टा देऊन स्वागत करण्यात आले.
गोंडवाना तील अनेक मोती इतर पक्षात अडगळीत पडलेले आहे. अशा मोत्यांना वेचून व एका धाग्यात गुंफून गोंडवानाचा मोतीहार तयार करायचाय यांची सुरुवात पिपर्डा गावापासून होत आहे हा आनंदाचा क्षण आहे. गोंडवाना समग्र क्रांती विकास आंदोलनाची चळवळ उभारण्यासाठी आमचे प्रेरणास्थान गोगपा संस्थापक दादा हिरांसिंह मरकाम यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. सामाजीक, धार्मिक चळवळ उभी करण्यास धर्माचार्य डॉ. मोतीराम कंगाली, के.बा. मरसकोले, सुन्हेरसिंह ताराम, शितलजी मरकाम यांनी आपला देह झिजविला म्हणून आम्हाला गोंडवाना ची खरी ओळख झाली. त्यांचे आम्ही कृतज्ञ आहोत असे विचार उद्घाटनीय भाषनात जिल्हध्यक्ष बापुराव मडावी यांनी व्यक्त केले. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही प्रवाहा सोबत नसल्याने आज आमचा हक्काचा माणूस सत्ते पासून दूर आहे ही आमची चूक आम्हाला कळली. आम्ही आमच्या स्वत:च्या घरात आल्याचे समाधानी आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला जि.प. माजी सदस्य सुधाबाई दे. सिडाम, मेजर नामदेव किनाके, सरपंच अरूण मडावी, वसंत मडावी, पं.स.माजी सभापती भिमराव मेश्राम, सेवा सह. संस्था अध्यक्ष उध्दवराव कुळसंगे, मेजर बंडूजी कुमरे, राणी हिराई मंडळ अध्यक्षा गोपिका किनाके, हनमंतू कुमरे, गोंडपिंपरी येथील देवराव मडावी, जितू मडावी, शंकर पा.कुळमेथे, शामराव उईके प्रमुखतेने उपस्थित होते. प्रास्ताविक संजय सोयाम माथा, संचालन चंपत येळमे यांनी केले तर आभार कु. अश्विनी कोरांगे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.